पुंडलिकनगर परिसरात खळबळ स दोन आरोपींना अटक
चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून प्रितेश प्रभाकर शिंदे या 18 वर्षीय तरुणाचा धारदार चाकुने भोसकून खून करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री उशिरा पुंडलिकनगर येथील गल्ली क्र. 1 मध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी त्वरित हालचाल करून आज सकाळीच राजू जनार्दन पैठणकर व प्रवीण राऊत रा. गल्ली क्र. 4 पुंडलिकनगर यांना अटक केली. या घटनेमुळे पुंडलिकनगर भागात खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, मृत प्रितेशचा ओळखीचा असलेला नंदू शेलार याचे चार दिवसांपूर्वी शेजारील गल्ली मध्ये राहणार्या प्रवीण राऊत व बेबी राऊत यांच्याशी भांडण झाले होते.त्यावेळी प्रितेश हा नंदू शेलार च्या बाजूने उभा होता.
हाच राग राऊत यांच्या मनात होता
रविवारी रात्री 10.45.वाजेच्या सुमारास मृत प्रितेश हा विनोद गायकवाड व सत्यम जाधव या दोन मित्रसह घरी आला व त्याने वडिलांकडून 100 रुपये घेतले व तो बाहेर पडला.तो रस्त्यावर येताच त्याला आरोपी राजू पैठणकर,प्रवीण राऊत आणि त्याची आई बेबी राऊत या तिघांनी अडविले व मारहाण करण्यास सुरुवात केली. तिघेही बेदम मारहाण करीत असल्याचे पाहून दोन्ही मित्रांने मध्यस्थी करीत भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत होते.त्याच दरम्यान आरोपी राजूने जवळील धारदार चाकू काढून प्रितेशच्या पोटात भोसकले. जखमी होताच प्रितेश रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला. त्यानंतर आरोपी प्रवीणने दोन्ही हातानी प्रितेशचा गळा दाबला तर त्याची आई बेबी राऊत ही हाता चापटाने मारहाण करीत होती. आरडाओरड एकूण प्रितेशचे वडील प्रभाकर शिंदे बाहेर आले त्यांनी मित्रांच्या मदतीने भांडण सोडविले. दरम्यान तिन्ही आरोपीनी घटनास्थळावरून पोबारा केला. जखमी अवस्थेत प्रितेशला त्याचे मित्र शुभम लाखोलकर व हिमांशू जैस्वाल यांनी दुचाकीवरून खासगी रुग्णालयात घेऊन गेले.प्रितेश ची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून त्यास पुन्हा ऐका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.तेथे मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.या प्रकरणी रात्री मृताच्या वडिलांनी पुंडलीकनगर पोलीस ठाणे गाठत तिन्ही आरोपी विराधात गुन्हा दाखल केला. रात्री तातडीने पुंडलीकनगर पोलिसांनी प्रवीण राऊत ला उचलले होते.तर फरार झालेला मुख्य आरोपी राजू पैठणकर हा जुना मोंढा येथील भवानीनगर येथे एका घरात लपून बसला आहे.ही माहिती गुन्हे शाखेचे उप निरीक्षक योगेश धोंडे यांना मिळाली होती. खात्रीलायक माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने भवानीनगर मध्ये सापळा रचून पहाटे 5.15 मिनिटांनी आरोपी राजुला अटक केली त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली (एम.एच.20.ई.बी.5670) या क्रमांकाची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.आरोपीला पुढील कार्यवाही साठी पुंडलीकनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.पुढील तपास साह्ययक निरीक्षक घनश्याम सोनवणे हे करीत आहेत.












